Estate agency business idea in marathi | इस्टेट एजंसी व्यवसाय
By Jayu Hedau,
How to do business | व्यवसाय कसा करायचा?
एखाद्या विशिष्ट म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी एखादा गाळा भाड्याने घ्यावा आणि तिथे ऑफिस करायचे. सुंदर व्यक्तिमत्व आणि बोलायला उत्तम असलेली एखादी रिसेप्शनला फोन कॉलिंग ला घ्यायची. लोकल च्या वृत्तपत्रातून प्रॉपर्टी विषयांची माहिती गोळा करावी. शहरात जिथे जिथे मोठ्या इमारतींचे बांधकामे चालू असतील, त्या बिल्डिंगच्या बिल्डर कडून फ्लॅट विक्री संबंधी कमिशन बाबत बोलणी करून यायचे. आणि जस जसे फ्लॅट विकले जातील तसे तुम्ही कमिशन घेऊ शकताहा व्यवसाय म्हणजे एखाद्या व्यक्तीचा फ्लॅट,जागा,शेती,घर,प्रॉपटी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला विकणे होय. जे काही विकायचे असेल त्याची पूर्ण माहीत आपल्या ऑफिस ला जमा करून ठेवायची आणि ज्याला कोणाला हवी असेल त्याला ही माहिती पुरवणे. जर घेणारा व्यक्ती इच्छुक असेल तर विकणाऱ्याची आणि घेणाऱ्याची समोरासमोर भेट घालून द्यायची. जर का डील फायनल झाली तर घेणाऱ्या पार्टीकडून 3% आणि देणाऱ्या पार्टी कडून 5% व्यवराच्या रकमेतुन घ्यावे.
हा व्यवसाय सुरू करण्या आधी शॉप ऍक्ट कायद्याप्रमाणे परवाना घ्यावा.