CFL BULB business idea in marathi
By, Jayu Hedau
19 Jan,2023
विद्युत उपकरणे ही आज प्रत्येक घराची आवश्यकता आहे. आज प्रत्येक घरात विजेचे दिवे वापरले जातात. राज्यात कोतितरी भागात अंधार असतो. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसलेने विजमंडळाने वीज कपातीचे धोरण अवलंबतात. ग्रामीण भागात तर काही काही ठिकाणी दहा तासांपासून ते पंधरा तासा पर्यंत वीज खंडित केली जाते. या च्यावर पर्याय म्हनून सि.एफ.एल बलांची निर्मिती झाली. पूर्वी आपण जे बल(bulb) वापरत होतो ते सरासरी साठ व्हॅट चे असायचे व ट्यूब चाळीस व्हॅट ची असायची. त्यामुळे सर्वसाधारण चार पाच खोल्याच्या घरात तीनशे चारशे व्हॅट विजेची गरज भासायची. हे बल व ट्यूब पाच खोल्याच्या घरात तीनशे चारशे वॅट विजेची गरज भासायची. हे बल व ट्यूब विजेचा दाब कमी जास्त झाला तर खराब व्हायचे. वर्षांतून चार पाच वेळा घरातील बळ व ट्यूब बदलायला लागायचे. पण सि.एफ.एल बल हे कमीत कमी एक वर्ष तरी खराब होत नाहीत व त्यांच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या तशी हमी पण देतात. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सि.एफ.एल बल एकदम कमी वॅट मध्ये प्रकाशमान होतात. सि.एफ.एल बल चा प्रकाश हा एकदम स्वच्छ असतो. विजेची फार मोठ्या प्रमाणात बचत हे सि.एफ.एल बल चे वैशिष्ट्य. नवंउद्योजकांनी ह्या सि.एफ.एल बल चे जर उत्पादन घेतले ते आज त्यांना बाजारात खूप मागणी आहे.