फोटो स्टुडिओ business ideas in marathi:
By, Jayu Hedau
18 Jan , 2023
फोटो स्टुडिओ चा व्यवसाय हा खूप मोठा व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय खूप वर्षांपासून सुरू आहे. हमखास यश देणारा, कोठेही नुकसान न करणारा हा व्यवसाय आहे. Training घेतल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. फोटो हा जसा कुतूहलाचा विषय आहे तसा तो इंटरेस्टिंग व्यवसाय ही आहे. आता प्रत्येक घरात जरी camera असला तरी तो फोटो डेव्हलप करण्यासाठी स्टुडिओ मध्ये जावेच लागते. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असो, वाढदिवस असो, लग्न समारंभ असो,स्नेहसंमेलन असो अशा कार्यक्रमात फोटो हमखास काढले जातात. शासकीय कामे करताना, बँकेत खाते उघडताना, आयकार्ड साठी, पासबुक साठी, फोटो हे लागतातच आणि हे फोटो स्टुडिओ मध्ये काढले जातात. आपण काढलेले फोटो आणि एका फोटोग्राफर ने काढलेले फोटो यांच्यात खूप फरक असतो. कोणत्या अँगल मधून चांगला फोटो काढता येतो, कोणती व्यक्ती कोणत्या पोज मध्ये चांगली दिसते, त्यांच्या पाठीमागे बॅकग्राऊंड काय असावे याचे चांगले ज्ञान हे फोटोग्राफर ला असते. आपण जर फोटोग्राफी, फोटो developing, विडिओ शूटिंग,अलबम मेकिंग यांचे प्रशिक्षण घेतले तर अनुभवाने तुम्ही एक उत्तम फोटोग्राफर होऊ शकता.