Tours and travels business idea in marathi | टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी
By Jayu Hedau,
27 Nov 2022.

Marketing | मार्केटिंग
मित्रांनो व्यवसाय सुरू करने एकदम सोपे आहे पण तो व्यवसाय पुढे चालू ठेवणे अवघड आहे. व्यवसाय मोठा करण्यासाठी महत्त्वाचे आहे मार्केटिंग करणे. जेवढे जास्त तुम्ही मार्केटिंग कराल तेवढे ग्राहक तुमच्या जवळ येतील. तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग तुम्ही पेपर जाहिरात, होर्डींग लावून, तसेच केबल नेटवर्क ला ऍड देऊन करू शकता. तुम्ही जेवढी चांगली सर्व्हिस देशिला तेवढी तुमची मार्केटिंग चांगली होईल आणि तुमच्या ग्राहकांपासून पण तुम्हाला ग्राहक जोडले जातील. तुम्ही मार्केटिंग social media पासून पण करू शकता.
How to get customer | ग्राहक कुठून मिळतील
मित्रानो ट्रॅव्हल एजन्सी ला ग्राहक तुम्हाला शाळा किंवा महाविद्यालयाच्या सहलींचे आयोजन करून मिळतील तसेच लग्नाला लक्झरी ट्रॅव्हल्स भाड्याने देऊन मिळतील. तुमच्या एजन्सी मधून रेल्वे, विमान तिकीट बुक करून द्यावीत. याच्यामुळे तुमच्या कडे ग्राहक वाढतील.
Requirement for agency । एजन्सीसाठी लागणारे साहित्य.
व्यवसायासाठी जागा असणे खूप महत्वाचे असते. म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय कुठे सुरू करता हे महत्वाचे आहे. तुम्ही या व्यवसायासाठी गाळा घेताना अश्या ठिकाणी घ्या की जिथे गर्दी खूप असेल किंवा तो एक मोठा चौक असेल तर अति उत्तम. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक कॉम्पुटर असला पाहिजे सेकंड हँड असला तरी चालेल स्वस्तात भेटला तरी चालेल. कॉम्पुटर हा पाहिजेच तिकीट बुकिंग करण्यासाठी. बुकींग बुक एक घ्यायला हवे.Business expenses | व्यवसायासाठी येणारा खर्च
व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर खर्च हा येणारच किती खर्च येईल याची माहिती खाली दिलेली आहे.गाळा भाडे- 3000 ते 5000.
कॉम्प्युटर- 10000 (सेकंड हँड).
जाहिरातीचा खर्च-5000.
बुकिंग बिल - 500.
टेबल आणि खुर्ची- 2000.
एकूण - अंदाजे 25000.
अशाच विविध प्रकारच्या माहिती साठी लगेच आमच्या Page ला Follow करा