Fabrication Business idea in marathi | फॅब्रिकेशन उद्योग
By Jayu Hedau,
26 Nov 2022
लोखंडी वस्तुंपासुन दैनंदिन जीवनातील आवश्यक असणार्या वस्तु बनवणे, वेल्डींगद्वारे लोखंडी वस्तु साधणे, तुटलेल्या वस्तु जोडणे किंवा नवीन वस्तु बनवुण देने, तसेच औद्योगिक क्षेत्रातील वस्तु अवजारे तयार करणे, शेताकरीता लागणारी अवजारे बनवणे अशी कामे ह्या उद्योगात करता येतात. भांडवालाची उपल्बधता असेल तर ग्राहकाना हव्या असनार्या नवीन लोखंडी वस्तु तयार करुन विकणे, मोठ्या होलसेल व्यापार्याना पुरविणे किंवा ग्राहकाना हव्या असणार्या वस्तु त्यांचेकडुन कच्चा माल तयार करुन देने अशा दोन्ही प्रकारे हा व्यवसाय करता येईल.
How to do business? | व्यवसाय कसा करावा?
थोड्याश्या शारिरीक कष्टाची तयारी असेल तर ग्रामिण किंवा शहरी भागातील नव युवकाना या व्यवसायात आयुष्यभर उत्पन्न मिळते. मोठमोठ्या कंपन्या याना नेहमीच वेल्डींग ची किंवा फॅब्रिकेशन वर्क्स ची आवश्यकता असते. एखादे वेल्डिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, कटर अवजारे घेऊन हा व्यवासाय उभा करता येतो. व्यवसायाची सुरुवात करणे पुर्वी तुम्ही स्वता किमान वर्षभर एखाद्या फॅब्रिकेशन वर्क्स मधे काम करुन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल. त्यानंतर दोन अकुशल कामगार, हेल्पर हाताखाली घेऊन व्यवसायाची सुरुवात करता येते. गावात, शहरात गाड्या वाहणांची मोडतोड झालेनंतर जोड्काम करणे, दैनंदिन गरजेच्या वस्तू बनवुन देणे उदा. कपाटे, तिजोर्या, पाळणे, खुर्च्या, अशा वस्तू बणवुन देऊन तुम्ही उत्पादन करु शकता.
Market | बाजारपेठ
स्ठानिकच्याच कंपन्या, कारखाने यांची फॅब्रिकेशन ची कामे करुण देता येतील, त्याबरोबर स्थानिकाच्या किंवा शहरामधील व्यापार्याना तिजोरी, कॉट, पाळणे, कपाटे, खुर्च्या अशा लोखंडी वस्तू बनवुन देता येतील, गावातील घरांची, बंगल्यांची ग्रील्स, खिडक्या, दारे बनुवन देता येतील.
