Agarbatti business idea in marathi | अगरबत्ती उद्योग
By Jayu Hedau
24 Jan , 2023
भारता मध्ये अगरबत्ती ला खूप महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात,
धार्मिक विधींमध्ये,
पूजा अर्चा करण्यासाठी अगरबत्तीचा उपयोग केला जाती. घरच्या घरी महिला व पुरुषणा नाममात्र पैशात सुरू करता येण्यासारखा व त्वरित रोकड पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणून या उद्योगाची निवड करता येते. या उद्योगाची व्याप्ती व विस्तार हा त्या उद्योगात केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. अगरबत्ती व्यवसायात प्रत्यक्ष अगरबत्ती तयार करणे,
तयार केलेल्या अगरबत्तीस सुवासिक करणे,
तसेच अगरबत्ती व्यवसायाचे साहित्य पुरविणे असे सहव्यवसायही करता येतात.घरी जर बेरोजगार व्यक्ती असतील तर अगरबत्ती तयार करणे व मार्केटींग करणे असा घरगुती उद्योग सुरू केला तर तो उद्योग अल्पावधीतच मोठ्या उद्योगात रुपांतरीत होतो. फक्त अगरबत्ती तयार करून जास्त नफा मिळवता येते नसलेने अगरबत्तीची काडी तयार करणे,
त्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध देने,
चांगल्या पॅकिंग मध्ये मार्केट ला पाठवणे महत्वाचे आहे. अगरबत्ती साठी लागणारा कच्चा माल हा मार्केट मध्ये होलसेल दुकानदाराकडे मिळतो. एक किलो पिठा पासून साधारण 1600
अगरबत्या तयार होतात. अगरबत्ती तयार झाल्यानंतर तिला मार्केट मध्ये विकता यावी किंवा तिची योग्य किमतीत विक्री व्हावी म्हणून त्याला सुगंधी सेंटड कराव्यात. यालाच सेंटेड किंवा सुग्नधी अगरबत्ती म्हणतात. अगरबत्ती व्यवसायात प्रचंड मोठी बाजारपेठ व ग्राहकही उपलब्ध आहेत. अगरबत्तीचा ग्राहक का नेहमी नवीन नवीन ब्रँड शोधत असतो. विविध सेंट एकत्रित करून एखादा खास ब्रँड बाजारात आणनेचा प्रयत्न करा.Marketing | मार्केटिंग
तुम्ही डोअर टू डोअर मार्केटिंग करू शकता,
त्याचबरोबर किराणा स्टोअर,
स्टेशनरी,
बाझार या ठिकाणीही अगरबत्ती विक्री करता येईल.Raw material | कच्चा माल
कोळसा पावडर,
चिकट पावडर,
नर्गिस पावडर,
कच्ची काडी,
विविध मसाल्याचे तेल,
सुगंधी अर्क,
फुलांचे अर्क,
धूप,
चंदन तेल,
गुलाबाच्या पाकळ्या. आवश्यकतेप्रमाणे नजीकच्या होलसेल व्यापाऱ्यांकडून खरीदता येईल