Beauty parlor Business idea in marathi

Beauty parlor Business idea in marathi

ब्युटी पार्लर हा एक सेवा उद्योग आहे. सुंदर दिसण्याकरीता महीला विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने वापरतात. काही वर्ष्यांपुर्वी मोठ्या शहरातच लेडीज ब्युटी पार्लर असायची परंतू आज फॅशनचा जमाना आहे. छोट्या गावातही लेडीज ब्युटी पार्लर दिसुन येतात. आपल्या चेहर्‍याला कोणते कॉस्मेटीक, कशा प्रकारचे मेकअप शोभुन दिसेल हे बहुतांश स्त्रियाना माहिती नसते.

 How to do business | व्यवसाय कसा करावा

लेडीज ब्युटी पार्लर्स चालवण्याकरीता कौंटरला व प्रत्यक्ष सेवा देण्याकरीता महीला कामगारच असाव्या लागतात. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करण्याकरिता तुम्ही पुर्ण प्रक्षिशित असावे लागते. खाजगी व्यावसायिक संस्ठा सहा महिन्याचा कोर्स शिकवतात. त्यांचेकडुन शिक्षण घेऊन किंवा कोणत्या तरी पार्लर मधे प्रत्यक्ष काम करुन अनुभव घ्यावा. प्रत्यक्ष अनुभव हा व्यवसायात हमखास उपयोगी पडतो. ह्या व्यवसायासाठी कामागार म्हणुन महिलाच आवश्यक असतात. मसाचे विवि प्रकार असुन शारिरीक स्वास्ठ व आरोग्याकरिता कित्येक महिला मसाज घेतात. मसाजचे प्रशिक्षण घ्यावे किंवा प्रशिक्षित कामगार घ्यावी. उत्तम दर्जाची सेवा, केशरचनेच विविधता, आकर्षक मेकअप हे व्यवसायाचे वैशिष्ठ्य आहे. ग्रामीण भागात हि ब्युटी पार्लरमधे जाणेची फॅशन आली आहे. ग्रामीण भागात ह्या व्यवसायाला फारशी स्पर्धा नसल्याने थोड्याश्या मोठ्या खेड्यात एखादा दुकान गाळा घेऊन व्यवसाय सुरु करता येतो. ह्या व्यवसायात हमखास यश येते. 

Market |  बाजारपेठ

लग्न, वास्तुशांती, बचत गटांचे कार्यक्रम, लेडीज पार्ट्या, महिला मेळावा, समारंभ अशा कार्यक्रमात नेहमी हजेरी लावावी. तेथे महिलांशी सुसंवाद साधुन ओळखी वाढवाव्या. अश्या ओळखिनेच लोक तुमच्याकडे ग्राहक येतात. लोकलच्या केबल टिव्ही वर जाहिरात करावी. वर्तमानपत्रातुन जाहीरात करावी. 



#_marathi_finance_ #jshrapper123 

Jayu Hedau Blog's

Myself Jayu Hedau, I Live At Deori, Dist.Gondia Maharashtra. And I Learn In BBA 1st year.I Am Work As A Student And A Blogger.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post