Cosmetic business idea in marathi | कॉस्मेटिक उद्योग
By Jayu Hedau
30 Nov 2022
जगाच्या बाजारपेठेत हजारो कोटी रुपयांची उलाढाल असणारा हा उद्योग असुन भारतीय सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीत चांगली वाढ झालेली दिसुन येते. भारताची प्रचंड मोठी लोकसंख्या पाहता नवउद्योजकाना ह्या व्यवसायामधे मोठी संधी दिसुन येते. भारतीय हर्बल प्रसाधनाना विदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
How to do business? | व्यवसाय कसा करावा?
ग्राहकाच्या आरोग्याशी संबंधित कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर असलेने कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधने उत्पादित करताना शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियम, अटी, शर्ती व मानकांची पुर्तता करुनच उत्पादने बाजारात आणावी लागतात. उत्पादन सुरु करण्यापुर्वी आरोग्य खात्याचा परवाना घ्यावा लागतो. त्याच्या शिवाय हा उद्योग सुरु करता येत नाही. कॉस्मेटिक उत्पादने निर्मित करणेची जागा स्वच्छ व निवासी वस्त्यांपासुन दुर असावी लागते. या उद्योगाचा परवाना घेणारा उत्पादक हा स्वतः डि फार्मसी डिप्लोमा किंवा डिग्री किंवा रसायनशास्त्रा मधे इंटर पास केलेली असावा लागतो. ज्याना हा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यानी सर्वप्रथम द ड्रग्ज अॅन्ड कॉस्मेटिक अॅक्ट अॅन्ड रुल्स या शासकीय पुस्तकाचा अभ्यास करुन सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. माणसाच्या आरोग्याशी जवळचा संबंध असणारी कॉस्मेटिक उत्पादने असल्याने उद्योगाची सुरुवात करण्यापुर्वी शासनाच्या सर्व नियमांचे, कायद्याचे, अटी, शर्ती, मानकांची अगदी परिपुर्ण पुर्तता करुनच उत्पादन घ्यावे. सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनाची यादीत शेकडो उत्पादने येतात. त्यापैकी आपण कोणते उत्पादन सुरु करायचे त्याची निश्चिती सर्वप्रथम करावी. उदा. टाल्कम पावडर, क्रिम्स,बेबी पावडर, सुगंधी केसाचे तेल, इत्यादी. त्यासाठी लागणारा कच्चामाल स्थानिकच्या बाजारपेठेतुन किंवा जवळपास उपलब्ध होवु शकतो क याची खातरजमा करावी. जे कॉस्मेटिक उत्पादन घ्यायचे आहे त्याची स्पर्धक उत्पादने बाजारपेठेत किति आहेत, त्यांच्या किमती किती आहेत, त्यांच्या जाहिराती कशा आहेत, त्यांची वितरक प्रणाली कशी आहे, या सर्वांचा अभ्यास करावा. मार्केट रिसर्च करुन, तज्ञांकडुन उच्च दर्जा प्राप्त व्हावा म्हनुन फॉर्मुले बनवुन घेणे हि सर्व प्रक्रीया पुर्ण करुनच उत्पादन घ्यावे लागेल.
Market | बाजारपेठ
बाजारपेठेत ज्या उत्पादनास जास्त मागणी आहे व स्पर्धा कमी आहे असे उत्पादन बनवले असेल तर ते विकण्याकरीता ब्युटी पार्लर, दुकाने, सुपर मार्केट, मॉल्स तसेच होलसेल व्यापारी याना तुम्हि आपला माल देऊ शकता.
