या बाजारपेठेत चांगली वाढ होत आहे आणि तुम्हाला हि खूप मोठी संधी आहे.
आपण महिलांच्या कपड्यांचे दुकान सुरू करू शकता. महिलांच्या कपड्यांच्या उद्योगात नेहमीच चांगल्या संधी राहिल्या आहेत.
महिलांच्या कपड्यांचा बाजारही खूप मोठा आहे आणि मागणीही खूप जास्त आहे.
तुम्ही केवळ काही प्रकारच्या कपड्यांचेच Specialized दुकान सुरू करू शकता, जसे की साडी चे दुकान किंवा महिलांच्या ड्रेस चे दुकान.
या व्यवसायातुन तुम्ही अतिशय चांगला नफा कमाऊ शकता.
* 4) Kids Clothing Store (मुलांच्या कपड्यांचे दुकान)
भारतामध्ये मुलांच्या कपड्यांचं Market अतिशय वेगाने वाढत आहे. तुम्हाला हे माहीतच असेल कि कपड्यांचे मार्केट किती मोठ आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का ? की त्या संपूर्ण मार्केटचा एक मोठा भाग मुलांच्या कपड्यांनी व्यापलेला आहे.
असा अंदाज आहे की 2028 पर्यंत मुलांच्या कपड्यांच मार्केट 170000 करोड चं होणार आहे. या व्यवसायामध्ये किती संधी आहे हे आपण येथे समजू शकता.
तुम्ही मुलांच्या कपड्यांचे दुकान सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या दुकानात विविध प्रकारचे मुलांचे कपडे विकू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.
हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी मुलांना आवडतील असे कपडे तुम्हाला तुमच्या दुकानात ठेवावे लागतील.
* 5) Bangles Shop (बांगड्याचे दुकान)
बांगड्या भारतातील एक अतिशय प्रसिद्ध पारंपारिक आभूषण आहेत. भारतीय स्त्रियांना बांगड्या प्रचंड आवडतात. भारतीय संस्कृतीत बांगड्या फार महत्वाच्या मानल्या जातात. हे सौभाग्याचे अलंकार मानले जाते.
बांगड्यांना भारतात इतकी मागणी आहे की भारतात बांगड्यांना स्वतंत्र दुकाने आहेत.
बांगड्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. बांगड्या त्यांचे वेगवेगळे रंग आणि डिझाईन्समुळे पसंत केल्या जातात.
तुम्ही बांगड्यांचे दुकान सुरू करू शकता. हा एक अतिशय प्रसिद्ध व्यवसाय आहे. हा व्यवसाय गावात देखील चांगला चालू शकतो. तुम्ही Modern Style च्या बांगड्या देखील विकू शकता.
* 6). Mobile Retail Shop ( मोबाइल चे दुकान )
गेल्या वर्षी संपूर्ण जगात 150 करोड पेक्षा अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे.
भारतात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या 50 करोड पेक्षा जास्त झाली आहे आणि ही भारताच्या एकूण लोकसंख्येचा फक्त एक छोटासा भाग आहे. ही संख्या अतिशय झपाट्याने वाढणार आहे.
Jio आल्यानंतर मोबाइल आणि इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.
दररोज नवीन स्मार्टफोन बाजारात येतात. तुम्ही मोबाइल विक्रेता बनू शकता आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे चांगल्या Quality चे मोबाईल आणि स्मार्टफोन तुम्ही तुमच्या दुकानात विकू शकता.
एक मोबाईल 3 ते 4 वर्षे चांगला चालतो आणि जर कोणी खूपच काळजी घेत असेल तर तो आणखी काही दिवस चालतो परंतु कधीतरी पुन्हा नवीन फोन हा घ्यावा लागतोच.
जर तुम्ही चांगल्या Quality चे स्मार्टफोन विकले आणि सोबतच चांगली Customer Service दिली तर मला भरपूर ग्राहक मिळतील आणि Repeat Customer पण मिळतील
मोबाइल आणि स्मार्टफोनच Market खूप मोठं आहे आणि ते खूप वेगाने वाढत आहे. तुम्हीही या मोठ्या संधीचा फायदा घेऊ शकता.
* 7). Mobile Recharge Point (मोबाइल रिचार्ज पॉईंट)
Recharge केल्याशिवाय मोबाइलचा काहीही उपयोग नाही. जर स्मार्टफोन मध्ये बॅलन्स नसेल तर तो स्मार्टफोन काय कामाचा?
आजकाल लोक प्रत्येक महिन्याला मोबाईल ला रिचार्ज करतात. तुम्ही मोबाइल रिचार्ज चे ही काम करू शकता. तुम्ही हा व्यवसाय इतर व्यवसाय सोबत करू शकता.
हा व्यवसाय तुम्ही मोबाईलची संबंधित इतरही सोबत करू शकतात किंवा इतर जनरल दुकानांमध्येही तुम्ही ही सर्विस देऊ शकता.
या व्यवसायातून तुम्ही चांगला Side Income Generate करू शकता.
*8) Dry Fruits Shop ( ड्राय फ्रूट्स चे दुकान )
Dry Fruits सर्वांनाच आवडतात. Dry Fruits चा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. भारतीय Dry Fruits चे Market सुमारे 30000 कोटींच झाल आहे. लोक आरोग्याबद्दलही जागृत होत आहे त्यामुळे Dry Fruits चे Consumption वाढत आहे.
तुम्ही तुमच्या दुकानात विविध प्रकारचे Dry Fruits विकू शकता जसे कि बदाम, काजू, खजूर, अक्रोड, मनुके.
आजकाल लोक Specialized दुकान पसंत करतात त्यामुळे Dry Fruits चे Specialized दुकान हि चांगले चालते. Dry Fruits च्या Business मधून तुम्ही चांगली कमाई शकता.
अशाच विविध प्रकारच्या व्यवसाय विषयी माहिती साठी लगेच आमच्या Instagram Page ला Follow करा
1) _martahi_finance_
2) jshrapper123
