Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवतात? | What is Affiliate Marketing in Marathi


Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवतात? | What is Affiliate Marketing in Marathi

Affiliate Marketing काय आहे आणि त्यातून पैसे कसे कमवतात?
What is Affiliate Marketing in Marathi: 
Affiliate Marketing कसे काम करते आणि यातून पैसे कसे कमवतात याविषयी तुमच्या मनात खूप सारे doubt असतील. आज आम्ही याविषयी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहोत. आजचे युग हे computer, internet आणि online shopping / marketing चे आहे.

Online Shopping चा सध्या ट्रेंड सुरू आहे. हे सध्या अधिकाधिक प्रसिद्धीला येत असल्याने लोक आता ऑनलाइन व्यापार करण्यावर जोर देत आहेत. त्यामुळे लोक आता स्वतः e-commerce site आणि blogs बनवून पैसे कमवत आहेत.
जे लोक भरपूर वेळेपासून online business करत आहेत त्यांना affiliate marketing विषयी नक्कीच माहिती असेल. अनेक ब्लॉगर्स सध्या असे आहेत जे त्यांच्या ब्लॉग मध्ये याचा वापर करत आहेत मात्र अनेक ब्लॉगर असे देखील आहेत जे affiliate marketing चा वापर ब्लॉग मध्ये करत नाही. याचे अनेक कारण असू शकतात जसे की त्यांना affiliate marketing विषयी माहिती नसेल किंवा त्यांना संभ्रम असेल की आपण या affiliate marketing चा वापर आपल्या ब्लॉग मध्ये करू शकतो का? Affiliate link दिल्याने फायदा होईल का आणि ते योग्य असेल का?

आज या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला affiliate marketing काय असते? याविषयी माहिती देणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून ज्या ब्लॉगर्स ला थोडीफार माहिती आहे ते ब्लॉगर्स याचा वापर करून सहज त्यांच्या कमाई मध्ये वाढ करू शकतात. ज्यांना affiliate marketing विषयी बिलकुल माहिती नाहीये ते ब्लॉगर्स देखील या लेखाच्या माध्यमातून affiliate marketing विषयी जाणून घेऊन याचा त्यांच्या ब्लॉग मध्ये वापर करू शकता.
तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल जेणे करून तुमचे Affiliate Marketing विषयी असणारे सर्व doubts क्लिअर होऊन जातील. तर मग वेळ न घालवता चला सुरू करूयात….
एफिलियेट मार्केटिंग हा एक असा रस्ता आहे ज्याच्या माध्यमातून एक ब्लॉगर कोणत्याही एका कंपनीच्या प्रोडक्ट ला त्याच्या वेबसाईटच्या माध्यमातून विकून कमिशन कमवू शकतो. तुम्हाला जे काही कमिशन मिळणार आहे ते प्रोडक्ट वर अवलंबून असणार आहे. म्हणजे प्रोडक्ट जर फॅशन आणि लाइफस्टाइल या कॅटेगरी मधील असेल तर कमिशन जास्त मिळेल आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट असेल तर त्यावर कमी प्रमाणात कमिशन मिळते.
कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला प्रमोशन करायचे असेल तर तुमच्या वेबसाईटवर एक चांगल्या प्रकारे ट्राफिक असणे गरजेचे आहे. कमीत कमी 5000 daily visitors असतील तर मग तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. जर तुमची वेबसाईट नवीन असेल आणि त्यात कमी visitors असतील तर मग एखाद्या product ची ऍड तुमच्या ब्लॉग वर लावून देखील तुम्हाला होणारा फायदा हा तितका जास्त नसेल.

त्यामुळे हेच योग्य असेल की affiliate products तेव्हाच तुमच्या ब्लॉग मध्ये प्रमोट करा जेव्हा तुमच्या ब्लॉग वर चांगल्या प्रमाणात visitors येत असतील.

एफिलियेट मार्केटिंग कसे काम करते? | How Affiliate Marketing Works in Marathi

या प्रश्नाचे उत्तर जे लोक online field शी जोडून आहेत त्यांच्यासाठी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. ते जर affiliate start करू इच्छित आहेत तर मग त्यांना affiliate marketing काम कसे करते याविषयी जाणून घेणे खूप गरजेचे असते. जर एखादी product based कंपनी किंवा organization त्यांचे products विक्री वाढवू इच्छित असेल तर मग त्यांना त्यांच्या products ला promote करायचे असते. त्यासाठी मग त्यांना त्यांचा एक affiliate प्रोग्रॅम सुरू करायचा लागतो.

Affiliate Marketing हा व्यवसाय पूर्णपणे कमिशन बेसीस वर चालतो. जेव्हा कोणी एखादा व्यक्ती मग तो blogger किंवा एखाद्या वेबसाईट चा owner असेल तर तो या affiliate program ला जॉईन करतो, तेव्हा ती कंपनी किंवा organization त्याला ब्लॉग वर किंवा वेबसाईटवर प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी बॅनर किंवा लिंक देत असते. याशिवाय त्या blogger ला त्याच्या blog वर किंवा website वर त्याला बॅनर वेगवेगळ्या जागांवर लावायचा असतो.

जर एखाद्या ब्लॉग वर किंवा वेबसाईटवर जास्त प्रमाणात visitors येत असतील तर मग त्यातील काही लोक त्या प्रोडक्ट वर नक्की क्लीक करतील. अनेकदा ते लोक प्रोडक्ट जरी खरेदी करत नसतील तरी देखील त्या साईट वर जाऊन sign up तरी करतात. काही Product Based कंपनी यासाठी तुम्हाला कमिशन देतात तर काही कंपनी या product विक्री केल्यानंतर मग कमिशन देतात.

एफिलियेट मार्केटिंग विषयी काही महत्वपूर्ण संकल्पना
Affiliate marketing मध्ये खालील काही terms वापरल्या जातात. या संकल्पना म्हणजेच terms जाणून घेणे आपल्याला गरजेचे असते. चला तर मग अशाच संकल्पना विषयी जाणून घेऊयात.

1). Affiliates: Affiliates त्यांना म्हणले जाते जे व्यक्ती कोणत्या तरी affiliate program ला जॉईन होतात. हे लोक त्या कंपन्यांच्या products ला आपल्या source वर म्हणजेच blogs वर किंवा websites वर promote करतात. हा व्यक्ती कोणीही असू शकतो.

2)Affiliate Marketplace: काही अशा कंपनी आहेत ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये Affiliate Programs offer करत असतात. त्या साईट्स ला affiliate marketplace म्हणून ओळखले जाते.

3. Affiliate id:हा एक unique id असतो जो sign up केल्यानंतर आपल्याला मिळतो. Affiliate program जो तुम्ही जॉईन करतात त्यानुसार तुम्हाला एक Unique ID दिली जाते. यातून तुम्हाला SALES विषयी माहिती मिळण्यासाठी मदत होते. या ID च्या माध्यमातून तुम्ही तुमचे Affiliate Account मध्ये login करू शकता.

4. Affiliate Link :- या त्या लिंक असतात ज्या Affiliate ला product promotion करण्यासाठी लिंक देतात. या लिंक्स वर क्लीक करूनच मग visitors product पेज वर पोहोचतात. जिथे जाऊन ते एखादे प्रॉडक्ट खरेदी करू शकतात. या लिंक्स च्या माध्यमातून Affiliate programs मध्ये होणारे सेल्स ट्रॅक केले जातात.
5. Commission: एक यशस्वी सेलिंग झाल्यानंतर जी amount त्या सेल करणाऱ्या ब्लॉगर ला किंवा affiliate ला दिली जाते त्याला कमिशन म्हणतात. ही रक्कम affiliate ला प्रत्येक सेल नुसार दिली जाते. ही रक्कम सेल च्या काही टक्के असू शकते. ही रक्कम एक तर त्या सेलच्या काही टक्के असू शकते किंवा त्याच्यावर काहीतरी एक ठराविक रक्कम देण्यात येते. याविषयी संपूर्ण माहिती ही terms and conditions मध्ये दिलेली असते.
6. Link Clocking Affiliate लिंक्स या लांब आणि दिसायला वेगळ्या असतात. त्यामुळे एखाद्या URL शॉर्टनर चा वापर करून त्या शॉर्ट केल्या जातात. यालाच लिंक क्लॉकिंग म्हणतात.
7. Affiliate Manager:- काही Affiliate Programs मध्ये affiliate च्या मदतीसाठी आणि त्यांना सल्ला देण्यासाठी काही व्यक्ती नियुक्त केले जातात त्यांना affiliate manager म्हणतात.
8. Payment Mode:- Payment कसे भेटेल याच्या पद्धतीला payment mode असे म्हणतात. या माध्यमातून तुम्हाला Commission दिले जाणार आहे. वेगवेगळे affiliate वेगवेगळे modes offer करत असतात. यामध्ये cheque, wire transfer, PayPal इत्यादी Payment Mode असतात.
9. Payment Threshold: Affiliate marketing मध्ये affiliates ला कमिशन दिले जाते. हे काही minimum payment ठरलेले असते. Affiliate ला हे payment एका threshold नंतर मिळते. म्हणजे तितके पैसे त्याच्या affiliate अकाउंट मध्ये आल्यानंतर तो payment modes च्या माध्यमातून खात्यात घेऊ शकतात.

अशाच विविध प्रकारच्या माहिती साठी लगेच आमच्या Page ला Follow करा.....

Instagram :-

Facebook:-

Jayu Hedau Blog's

Myself Jayu Hedau, I Live At Deori, Dist.Gondia Maharashtra. And I Learn In BBA 1st year.I Am Work As A Student And A Blogger.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post