वाईन शॉप चा परवाना कसा मिळवावा ?



परवाना आणि कागदपत्रे:-
   बियर शॉप परवाना कुठे काढतात? खर्च किती येतो ?
मूळ प्रश्न:
वाईन शॉपचा परवाना कसा काढावा?
मूळ उत्तर:
वाईन शॉपसाठी परवाना मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या एक्साईज डिपार्टमेंटकडे अर्ज करणे आवश्यक असते. हेच डिपार्टमेंट अर्ज पडताळणी करून वाईन शॉप चे परवाने देते.

खाली वाईन शॉप काढण्यासाठी अधिकृत प्रक्रिया सांगितली आहे:
१. १० रुपये किमतीचा कोर्टचा स्टॅम्प घ्या
२. तुमच्या जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या राज्य सरकारच्या एक्साईज ऑफिसमध्ये जा. जर एक्साईज ऑफिस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नसेल तर कलेक्टर ऑफिसकडे चौकशी करून पर्यायी ऑफिसची माहिती मिळवा.
३. ऑफिसमधून परवान्यासाठी अँप्लिकेशन फॉर्म घ्या - हा फॉर्म मोफत मिळतो.
४. फॉर्म मधील सर्व माहिती भरा- नाव, जन्मतारीख, व्यवसाय आणि पत्ता
५. वरील माहितीचे प्रूफ म्हणून आवश्यक कागदपत्रे सोबत राहूद्या, जसे कि आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स
६. वर खरेदी केलेला स्टॅम्प अप्लिकेशन फॉर्म वर चिकटवा
७. अप्लिकेशन फॉर्म, फोटो आणि ऍड्रेस प्रूफ साठीच्या कागदपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रति ऑफिसमध्ये सबमिट करा.

अप्लिकेशन पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला परवाना मिळून जाईल.

संदर्भ:-

वरील प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता, पण ऑनलाईन सिस्टम आणि एक्साईज डिपार्टमेंटची वेबसाईट वापरण्यासाठी जास्त डिटेल्स कुठेही दिलेले नाही. http://exciseservices.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अकॉउंट उघडून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.


वरील माहिती खूप सरळ वाटते, आणि असे अप्लिकेशन करून परवाने मिळाले तर गल्लीगल्लीत सर्वांकडे वाईन शॉप परवाने दिसतील.

सर्वांकडे परवाने होऊ नये यासाठी एक अलिखित प्रथा सिस्टिम मध्ये पडली आहे. या प्रथेला आपण लाच म्हणून ओळखतो :). म्हणूनच भरमसाठ लाच देऊन लायसन्स मिळवणारे उदाहरणे आपल्याला दिसतात. परिणामी नुसता अर्ज करून परवाना मिळणे जवळपास अशक्यप्राय आहे.

   अशाच विविध प्रकारच्या व्यवसाय विषयी माहिती साठी लगेच आमच्या Page ला Follow करा
1)  _marathi_finance_
2) jshrapper123 

Jayu Hedau Blog's

Myself Jayu Hedau, I Live At Deori, Dist.Gondia Maharashtra. And I Learn In BBA 1st year.I Am Work As A Student And A Blogger.

1 Comments

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post